कृष्णाचे दहीपोहे .....!!
ह्या ब्लॉगमधील हे दुसरे पुष्प परमपूज्य नंदाईला अर्पण करत आहे. आपण सगळ्यांनी सुदाम्याच्या पोह्यांची पौराणिक कथा ऐकली आहे. आज मी तुम्हाला कृष्णाच्या 'दहीपोह्यां'ची कथा सांगणार आहे......!! -----------------------------------------------------------------------------------------------------------
हा आमचा अनुभव २००४ सालचा आहे. तेव्हा माझा मुलगा 'विभव' हा मराठी इयत्ता ६ वी मध्ये होता. तो ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी शाळेचा विद्यार्थी. त्या काळात मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करून होतो. माझं बरंच टुरिंग वगैरे असायचं. त्यामुळे मुलाच्या अभ्यासाकडे फारसं लक्ष नव्हतंच माझं. पण माझी सुविद्य पत्नी सौ. सुचित्रा ही मात्र हाडाची शिक्षिका असल्याने एखाद्या विद्यार्थ्याला मुशीतून कसं तयार करायचं, ह्या बाबतीत जाणकार होती. विभवच्या शाळेच्या बाबतीत तर ती कमालीची दक्ष असे. मुंबईची सायन्स टीचर्स असोसिएशन ही संस्था १९८१ पासून होमी भाभा बालवैज्ञानिक नावाची एक स्पर्धा दर वर्षी घेते. एके दिवशी ह्या स्पर्धेचे परिपत्रक मुलाच्या शाळेत आले. लेखी परीक्षा, प्रयोग परीक्षा (प्रॅक्टिकल्स) आणि तोंडी परीक्षा अशा तीन टप्प्यात ही परीक्षा घेण्यात येते. हिने आणि जवळच्या मैत्रिणींनी आपापल्या मुलांना ह्या परीक्षेला बसवण्याचे ठरवले. प्रॅक्टिकल्सची तयारी घरी करून घेणे शक्य नव्हते. ठाणे - मुलुंड परिसरातील दोन व्यावसायिक शिक्षिका सौ घारपुरे आणि सौ पाटील ह्या प्रकारची तयारी करून घेण्यात वाकबगार होत्या. तिथे विभवसाठी ऍडमिशन घेतली. लेखी परीक्षा विभव उत्तीर्ण झाला आणि मग प्रयोग परीक्षेच्या तारखा लागल्या. माझा मुलगा हा प्रामाणिक विद्यार्थी असल्याने त्याने चांगला अभ्यास करून प्रयोग परीक्षेचा टप्पाही पार केला. त्याच्याबरोबर शाळेतील आणखी काही विद्यार्थी-विद्यार्थीनी देखील ह्यामध्ये होते. आता शेवटचा आणि महत्वाचा टप्पा बाकी होता, तो म्हणजे 'तोंडी परीक्षेचा" !! ह्या परीक्षेत काहीही विचारू शकतात, त्यामुळे 'स्काय इज द लिमिट' अशी परिस्थिती होती. शेवटी एव्हढी छोटी मुलं सायन्ससारख्या अथांग विषयाची करून करून किती तयारी करणार ?? पण क्लासमधून एक शंभर पानांचे बुकलेट विद्यार्थ्यांना तयारीसाठी देण्यात आले होते. आत्तापर्यंत सगळी जबाबदारी सुचित्राने घेऊन विभवला ह्या निर्णायक टप्प्यापर्यंत आणले होते. आता मात्र तिने सगळी सूत्रे सरळ माझ्या हाती सोपविली. तोंडी परीक्षेच्या २ दिवस आधी मी सगळे बुकलेट नीट वाचून काढले आणि अंदाज घेतला. तोंडी परीक्षेच्या आदल्या दिवशी विभवला घेऊन तयारीला बसलो. सकाळी ठीक आठ वाजता आम्ही अभ्यास सुरु केला आणि रात्री १० वाजता संपवला. माझ्या मुलाला मी एव्हढंच सांगितलं कि "विभव, तुम्ही मुलं अजून खूप लहान आहात. त्यामुळे यापेक्षा फार काही बाहेरचं विचारतील असं वाटत नाही. तसेच मला पण ह्यापेक्षा जास्त काही येत नाही. त्यामुळे तू शांत झोप आज आणि उद्या परीक्षेला जाऊ आपण". त्याला पटले असावे.....
दुसऱ्या दिवशी तोंडी परीक्षेसाठी रुपारेल कॉलेजला जायचे होते. त्यामुळे आम्ही लवकर उठलो आणि आंघोळी करून न्याहरीसाठी बसलो. फारा दिवसांपासून आमच्याकडे अशी एक पद्धत आहे कि मुंबईत कुठेही एक पूर्ण दिवस बाहेर जायचे असेल, तर आम्ही ब्रेकफास्टला 'दहीपोहे' खाऊन जातो. त्या दिवशी आम्ही दहीपोहेच खाल्ले. ब्रेकफास्ट करताना विभवने मला विचारलं "बाबा, दही कसं बनतं हो ??". मला लक्षात आलं कि पोरगं परीक्षेला तोंड द्यायला चांगलं ट्यून-अप झालंय. म्हणून मी आणि पत्नीनं उत्साहानं पण त्याला समजेल अशा पद्धतीने दही बनण्याची किण्वन नावाची रासायनिक प्रक्रिया समजावून सांगितली. ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही बापूंना नमस्कार करून आणि उदी लावून गाडी घेऊन निघालो. घाटकोपर ओलांडल्यावर मी पत्नीला म्हटलं कि रुपारेलला जाणारा एखादा शॉर्टकट आहे का विचारायला पाहिजे ( मला माहिती असलेला एकमेव मार्ग दादरवरून होता. त्यावेळी GPS नव्हता ना ! ). शेवटी सायनच्या सिग्नलला आमच्या बाजूला उभे असलेल्या एका स्कुटरस्वाराला आम्ही विचारलं. आश्चर्य म्हणजे तो म्हणाला " मी रुपारेलकडेच जातोय, तुम्ही माझ्या मागून या. मी त्याला श्रद्धेने पण सावधपणे फॉलो केलं. थोड्या वेळाने रुपारेल आल्याची खूण केली त्याने आणि तो निघूनही गेला.( कोण होता तो नक्की..??)
कॉलेजमधे विद्यार्थी-विद्यार्थिनींची आणि पालकांची गर्दी होती. कारण मुंबई, पुणे, नाशिक,औरंगाबाद, विदर्भ, कोल्हापूर अशा महाराष्ट्राच्या वेगळ्या विभागांतून मुले आली होती. ह्यातून सुवर्ण पदकाचे मानकरी निवडले जाणार होते. सगळ्यांची व्यवस्था वेगवेगळ्या वर्गात केली होती. काही पालकांनी तर आपल्या पाल्याचा पिच्छा तिथेही न सोडता मिळेल तिथे बसून त्याची परीक्षेची तयारी करून घेण्याचा उत्साह दाखवला. अंदाजे २-३ तास वेळ थांबण्यात गेला. साधारण दुपारी २ वाजता व्हायव्हा (इति तोंडी परीक्षा) एकदाचा पार पडला. विभव एकदम हसत हसत बाहेर आला. तोंडी परीक्षा उत्तम झाल्याच्या खुणा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. ते तर खरंच होतं, पण आनंदाचं कारण जरा वेगळंच होतं. विभवने बाहेरच्या गॅलरीत नेऊन आम्हाला परीक्षेचा वृत्तांत सांगितला तो थक्क करणारा होता. तो म्हणाला " बाबा , you wont believe but पहिलाच प्रस्न विचारला गेला तो म्हणजे तू ब्रेकफास्टला काय खाऊन आलास आज ?? उत्तर - दहीभात , पुढला प्र.- "दही कसं बनतं रे ??"😲विभव आम्हाला म्हणाला कि हा प्रश्न ऐकल्यावर मी क्षणभर आश्चर्याने चमकलो, पण अर्थातच तुम्ही सांगितलेले सगळे मी लगेच त्यांना सांगून टाकले ". पहिल्याच चेंडूवर षटकार मारल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. पुढे चार प्रश्न विचारले गेले. त्यातल्या ३ प्रश्नांची उत्तरं त्याला अचूक येत होती, ती त्याने व्यवस्थित दिली. एका प्रश्नाचे उत्तर मात्र त्याला माहित नसल्याचं त्याने प्रामाणिकपणे सांगितलं (मला वाटतं तो 'डायमंड आणि कार्बन अणूं'संदर्भात होता).
अखेर महिन्याभराने निकालाचा दिवस आला. पारितोषिक वितरण समारंभ ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला होता. बक्षिसे मिळणार होती ती उच्च आणि बहू विद्याविभूषित श्री. संजय देशमुख (नंतर झालेले मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू) यांच्या हस्ते. मला बारावीला गणित शिकवणारे प्रा. चितळे सर देखील स्टेजवर होते म्हणून मला छान वाटलं. संपूर्ण रंगायतन गर्दीने भरून गेले होते. ज्या निवडक विद्यार्थ्यांनी लेखी व प्रयोग परीक्षेत यश मिळविले होते, त्यांना रौप्य पदके निश्चित झालीच होती. त्यामुळे विभवला रौप्यपदक मिळणार ह्याची इतर यशस्वी विद्यार्थ्यांप्रमाणे खात्री असल्याने स्वारी खुश होती. पण गोल्ड मेडल कुणाला हे मात्र गुलदस्त्यात होते. एकंदरीत ऑडिटोरियममध्ये थोडेसे तणावपूर्ण पण खूप उत्सवी वातावरण होतं. आधी २ यशस्वी विद्यार्थ्यांची मानवी जीवनातील सायन्सचं महत्व विशद करणारी इंग्रजीतून आणि मराठीतून अप्रतिम भाषणे झाली. ह्या दोन्ही मुलांनी अशी काही भाषणे केली कि एखादा शास्त्रज्ञ काय करेल. खूप अभिमान वाटला. कारण त्यात विभवच्याच वर्गातली एक विद्यार्थिनी खूप सुरेख बोलली (कु.अश्विनी गोरे). हल्लीच्या मुलांच्या हुशारीची पातळी सगळ्यांच्याच लक्षात आली. रौप्यपदकांचे वितरण उत्साहात पार पडले. त्यात विभवचं नाव नव्हतं !!😲तो आणि आम्ही जरा गोंधळून गेलो. कधीकधी एखाद्याचं नांव घ्यायला राहून जातं. तसं झालं असावं कदाचित, असं वाटलं. (जरी मला Logically थोडा अंदाज आला होता काय होणार त्याचा). शेवटी सुवर्णपदक विजेत्यांची नावे जाहीर झाली, ज्यात विभवचं नाव घेतले गेले आणि त्याच्या शाळेतल्या मुलांनी एकच कल्ला केला. आमच्या सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रु तरळले. He had made all of us proud today.....!!
कायमचा जपण्यासाठी हा सुवर्णक्षण बापूंनी आम्हाला दिला आहे .....🙏
मुक्त चिंतनासाठी काही प्रश्न ... :
१) एव्हढी सगळी कथा सांगितल्यावर विभवच्या यशाचा खरा सूत्रधार कोण होता, हे खरंच सांगितलं पाहिजे का ?? आमची पिढी आणि यापुढे येणाऱ्या पिढ्या ह्या कशा गोष्टी बुद्धीच्या कसावर सगळं घासून पाहणाऱ्या आहेत. त्यांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. अवघड स्पर्धात्मक परीक्षांना विचारतात तसा प्रश्न मी विचारतो कि, पुन्हा सगळी गोष्ट नीट वाचून बघा आणि सांगा कि ह्यात सगळ्या गोष्टी योगायोगाने घडल्या असं तुम्हाला खरंच वाटतं का ???
२) आम्ही घरी दही पोहे केले नसते, तर विभवला दह्याविषयीचा प्रश्न विचारायची बुद्धी झाली असती का ..??
३)स्कुटरस्वार नेमका कोण होता ?? खरंच सांगतो, मला पण हा योगायोग वाटला असता एरवी. पण त्यानंतर तोंडी परीक्षेत जे काही घडलं, ते ऐकल्यावर मात्र वाटतं कि तो दुसरा तिसरा कोणीही नाही पण...माझ्या सद्गुरूने पाठवलेला दूतच असणार, असं मानण्याला जागा आहे. त्या स्कुटरवाल्याच्या बाजूलाच गाडी उभी करण्याची मला सद्बुद्धी का झाली ??
४)अशी कल्पना करा कि विभव , त्याची आई आणि मी जर परीक्षेच्या बाबतीत पुरेसे कर्तव्य किंवा अभ्यास केला नसता , तर ह्यापुढचा अनुभव आला असता का ?? ह्याचे उत्तर 'नाही' असे आहे. ("तुम्ही जोर काढू लागा I दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा I वाटी घेऊनी उभाच मी मागां I पृष्ठभागां आहे कीं" II १५८ II - साई सच्चरित्र अध्याय १९). बापूंनी विभवकडून विद्यार्थी म्हणून मेहेनत करून घेतलीच, पण आमच्याकडूनही पालक म्हणून पुरेशी मेहेनत, कर्तव्य करून घेतले आणि मगच मॅच जिंकून दिली.
५) मला काही लोक विचारतील कि आम्ही पण अशी मेहनत करतो. आम्हाला कसे काय असे अनुभव नाही आले नाही अजून ?? मी त्यांना एव्हढच सांगेन " तुम्ही श्रद्धावान असाल, तर जरूर तुमचा सद्गुरू तुम्हाला असा अनुभव देईल, मग तो कोणीही असो.
६) एवढं सगळं झाल्यावर, विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना गर्व होईल का ?? आपल्याला जर माहित आहे की इथे श्रेय सद्गुरुचं आहे, तर गर्व येण्याचा प्रश्नच उरत नाही. आणि आलाच, तर गर्वहरण करण्याचे सामर्थ्यही माझ्या सद्गुरुत आहे हे निश्चित. त्यानुसार पुढला अनुभव मला येईलच....नाही का ??
ह्या ठिकाणी मला अभंग आठवतो - ' तो येतो कधी, तो जातो कधी ....ह्याचा नाही ठाव लागला ..!!"

विकाससिंह कात्रे, ठाणे.
मो. नं. : ९८३३६१०८७५
मो. नं. : ९८३३६१०८७५
II ॐ मन:सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः II 🙏

अंबज्ञ छान अनिरूध्दार्पणमस्तु नाथसंविध
ReplyDeleteश्रीराम अंबज्ञ नाथसंविध
ReplyDeleteAmbadyna,खूपच छान अनुभव,तो ठायी ठायी उभा आहे आपल्या सर्वांसाठी
ReplyDeleteKhup chan Jethe Jato Tethe Tu Maza Sangati Kharach Bapu with Mothi Aai is always with us Forever
ReplyDeleteAmbadnya .
ReplyDeleteNathsanvidh
Ambadanya
ReplyDeleteNathsamvidh
Ambadnya Nathsamvidh
ReplyDelete🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDeleteThank you Rashmi !!
Deleteखूप छान अनुभव..������
ReplyDeleteखूप छान अनुभव.. 🙏🙏🙏
ReplyDeleteChhanach
ReplyDelete