देव तारी , त्याला कोण मारी ...?? ह्या ब्लॉग मधले हे ३ रे पुष्प आहे. पहिल्या दोन्ही पेक्षा नक्कीच वेगळे ! ह्या लेखामध्ये चार अनुभव मुद्दाम एकत्र लिहिले आहेत, कारण त्यांचा विषय एकच आहे..... 'अपघात' (Road accident) !! चारही अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. इतके, कि मी अजूनही मला चिमटा काढून बघतो कि मी जिवंत आहे ना ...?? आणि 'जिवंत आहे' असे उत्तर मि ळाल्यावर क्षणभर 'मायावाद' खरा वाटू लागतो. (पण तो आपला विषय नाही). आपल्याला वास्तवातच जगावं लागतं. आणि ते शक्य होतं फक्त आणि फक्त 'सदगुरूकृपेमुळं' !! हे अनुभव लिहिताना सद्गुरूंचं 'अकारण कारुण्य' मला हळवं करतं. त्रिविक्रमाच्या १८ वचनांपैकी निदान चार वचनांचे प्रत्यंतर ह्या ४ अनुभवांतून मला आले ( न होऊ देईन तुमचा मी घात, करीन रक्षण मी निरंतर, सौम्य करीन दैव, सहस्रकोटी संकटे पळती भयाने ) आणि कदाचित आपल्यालाही येईल . हा अनुभव आहे १९९९ सालचा !! सा ई समर्थ विज्ञान प्रबोधिनीत...