Posts

Image
जया मनी जैसा भाव .... !!   आज २३ जुलै २०२१, म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस !! त्यानिमित्त ह्या ब्लॉगमधील ४ थे अनुभवपुष्प सद्गुरू अनिरुद्धबापूंच्या चरणी अर्पण करायला आनंद वाटतोय..... 🙏  ______________________________________________________________________ ही सत्यघटना साधारण २१ वर्षांपूर्वीची असावी. जेव्हा प. पू. अनिरुद्धबापूंनी आमच्या घरात अनुभवांची एक मालिकाच लावली होती.  त्या मालिकेतीलच हे एक पुष्प !!. गणपती उत्सवाचे दिवस होते. दर वर्षी गणेशोत्सवात आमचे त्या वेळचे गायनातील गुरुजी कै. विनायकबुवा काळे यांच्याकडे सकाळी एक गाण्याची बैठक होत असे. साधारण पन्नासएक विद्यार्थी बसतील असा  त्यांच्या घरातील हॉल होता. गणपती बेडरूममध्ये बसविलेला असे. बेडरुमही प्रशस्थच होती. एका वर्षी अशीच सकाळी ८ ची बैठक होती. एकेक विद्यार्थी यायला सुरवात झाली. घरी आलेला प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मैफिलीच्या आधी आतमध्ये जाऊन श्री गणेशा चे दर्शन घेऊन बाहेरील बैठकीत स्थानापन्न होत असे. मी देखील ह्या  शिरस्त्याप्रमाणे आल्याबरोबर आधी गणपतीचे दर्शन घेतले. ग...
Image
देव तारी , त्याला कोण मारी ...??  ह्या ब्लॉग मधले हे ३ रे पुष्प आहे. पहिल्या दोन्ही पेक्षा  नक्कीच वेगळे ! ह्या  लेखामध्ये  चार अनुभव मुद्दाम एकत्र लिहिले आहेत, कारण त्यांचा विषय एकच आहे..... 'अपघात' (Road accident) !! चारही अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. इतके, कि मी अजूनही मला चिमटा काढून बघतो कि मी जिवंत आहे ना ...?? आणि 'जिवंत आहे' असे उत्तर  मि ळाल्यावर क्षणभर 'मायावाद' खरा वाटू लागतो. (पण तो आपला विषय नाही). आपल्याला वास्तवातच जगावं लागतं. आणि ते शक्य होतं फक्त आणि फक्त 'सदगुरूकृपेमुळं' !! हे अनुभव लिहिताना सद्गुरूंचं 'अकारण कारुण्य' मला हळवं करतं. त्रिविक्रमाच्या १८ वचनांपैकी निदान चार वचनांचे प्रत्यंतर  ह्या ४ अनुभवांतून   मला आले  ( न होऊ देईन तुमचा मी घात, करीन रक्षण मी निरंतर, सौम्य करीन दैव, सहस्रकोटी संकटे  पळती  भयाने )  आणि  कदाचित  आपल्यालाही  येईल  .  हा अनुभव आहे १९९९ सालचा !! सा ई समर्थ विज्ञान प्रबोधिनीत...
Image
कृष्णाचे दहीपोहे .....!! ह्या ब्लॉगमधील हे दुसरे पुष्प परमपूज्य नंदाईला अर्पण करत आहे. आपण सगळ्यांनी सुदाम्याच्या पोह्यांची पौराणिक कथा ऐकली आहे. आज मी तुम्हाला कृष्णाच्या 'दहीपोह्यां'ची कथा सांगणार आहे......!!                  ------- ---------------------------------------------------------------------------------------------------- हा  आमचा अनुभव २००४ सालचा आहे. तेव्हा माझा मुलगा 'विभव' हा मराठी इयत्ता ६ वी मध्ये होता. तो ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी शाळेचा विद्यार्थी. त्या काळात मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करून होतो. माझं बरंच टुरिंग वगैरे असायचं. त्यामुळे मुलाच्या अभ्यासाकडे फारसं लक्ष नव्हतंच माझं. पण माझी सुविद्य पत्नी सौ. सुचित्रा ही मात्र हाडाची शिक्षिका असल्याने एखाद्या विद्यार्थ्याला मुशीतून कसं तयार करायचं, ह्या बाबतीत जाणकार होती. विभवच्या शाळेच्या बाबतीत तर ती कमालीची दक्ष असे. मुंबईची सायन्स टीचर्स असोसिएशन ही संस्था १९८१ पासून होमी भाभा बालवैज्ञानिक नावाची एक स्पर्धा दर वर्ष...
Image
भेळपुरीवाला 'विठ्ठल'...!! हा अनुभव १९९९ सालचा आहे.....  !! तुम्ही फोर्टातल्या न्यू एक्सलसिअर सिनेमा थिएटरजवळच्या 'विठ्ठल' मध्ये कधी भेळपुरी खाललेय का ?? मुंबईतली मला सगळ्यात आवडणारी भेळ तो द्यायचा. आता देतो कि नाही माहिती नाही. पण त्याच्यापेक्षा 'मंतरलेली भेळ' देणाऱ्या माझ्या  विठ्ठला ने मला दिलेला हा अनुभव आहे ...... त्या  काळात  गुरुवारची उपासना आणि बापूंचे प्रवचन दादरच्या  अँटोनियो डिसिल्वा हायस्कुलला  व्हायचे. एका गुरुवारी मला बापू परिवारात आणणारा माझा अनेक वर्षांचा मित्र चारुहाससिंह (शृंगारपुरे) आणि मी अशा दोघांनी ऑफिस संपल्यावर चारुच्याच कारने दादरकडे कूच केले. मला त्याने संध्याकाळी   ठीक ५. ३० वाजता  कांजूरहून पीक-अप केले. दिवसभर खूप कामात गेल्यामुळे माटुंगा येईपर्यंत आम्हां दोघांनाही सडकून भूक लागली. एकदा विचार आला कि कुठेतरी हॉटेलजवळ गाडी थांबवून खाऊन घ्यावे. पण तसं केलं असतं, तर उपासना केंद्रावर पोचायला उशीर झाला असता. दादरच्या टिळक ब्रिजवर आल्यावर चारुने  एक वेगळीच शक्कल सुचविली. तो म्ह...