कृष्णाचे दहीपोहे .....!! ह्या ब्लॉगमधील हे दुसरे पुष्प परमपूज्य नंदाईला अर्पण करत आहे. आपण सगळ्यांनी सुदाम्याच्या पोह्यांची पौराणिक कथा ऐकली आहे. आज मी तुम्हाला कृष्णाच्या 'दहीपोह्यां'ची कथा सांगणार आहे......!! ------- ---------------------------------------------------------------------------------------------------- हा आमचा अनुभव २००४ सालचा आहे. तेव्हा माझा मुलगा 'विभव' हा मराठी इयत्ता ६ वी मध्ये होता. तो ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी शाळेचा विद्यार्थी. त्या काळात मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करून होतो. माझं बरंच टुरिंग वगैरे असायचं. त्यामुळे मुलाच्या अभ्यासाकडे फारसं लक्ष नव्हतंच माझं. पण माझी सुविद्य पत्नी सौ. सुचित्रा ही मात्र हाडाची शिक्षिका असल्याने एखाद्या विद्यार्थ्याला मुशीतून कसं तयार करायचं, ह्या बाबतीत जाणकार होती. विभवच्या शाळेच्या बाबतीत तर ती कमालीची दक्ष असे. मुंबईची सायन्स टीचर्स असोसिएशन ही संस्था १९८१ पासून होमी भाभा बालवैज्ञानिक नावाची एक स्पर्धा दर वर्ष...