देव तारी, त्याला कोण मारी ...??
ह्या ब्लॉग मधले हे ३ रे पुष्प आहे. पहिल्या दोन्हीपेक्षा नक्कीच वेगळे ! ह्या लेखामध्ये चार अनुभव मुद्दाम एकत्र लिहिले आहेत, कारण त्यांचा विषय एकच आहे..... 'अपघात' (Road accident) !! चारही अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. इतके, कि मी अजूनही मला चिमटा काढून बघतो कि मी जिवंत आहे ना ...?? आणि 'जिवंत आहे' असे उत्तर मिळाल्यावर क्षणभर 'मायावाद' खरा वाटू लागतो. (पण तो आपला विषय नाही). आपल्याला वास्तवातच जगावं लागतं. आणि ते शक्य होतं फक्त आणि फक्त 'सदगुरूकृपेमुळं' !! हे अनुभव लिहिताना सद्गुरूंचं 'अकारण कारुण्य' मला हळवं करतं. त्रिविक्रमाच्या १८ वचनांपैकी निदान चार वचनांचे प्रत्यंतर ह्या ४ अनुभवांतून मला आले ( न होऊ देईन तुमचा मी घात, करीन रक्षण मी निरंतर, सौम्य करीन दैव, सहस्रकोटी संकटे पळती भयाने ) आणि कदाचित आपल्यालाही येईल .
हा अनुभव आहे १९९९ सालचा !!
साई समर्थ विज्ञान प्रबोधिनीतर्फे पंचशील परीक्षांचा निकाल घोषित झाला होता. त्या काळी प. पू. बापू स्वतः पेपर्स तपासायचे. परीक्षार्थींना आपण काय लिहिलंय ह्यापेक्षा साक्षात 'बापू' आपला पेपर तपासतायत ह्याचंच मोठं अप्रूप असायचं (आणि साहजिकच आहे ते !). मेडल्स आणि उत्तरपत्रिका वितरण समारंभाबरोबरच सत्संग कार्यक्रमाचे आयोजनही होणार होते. काही गाणाऱ्या वाजवणाऱ्या श्रद्धावानांना एकत्र घेऊन सत्संगाच्या पूर्वतयारीची जबाबदारी प्रसिद्ध गायिका सौ वर्षाताई भावे ( नंतर 'ऐलतीरी पैलतीरी' ह्या कॅसेटचे संगीत देणाऱ्या) यांच्याकडे होती. त्यांनी पूर्वीच्या 'नवनीत' ऑफिसजवळच एका सोसायटीच्या आवारात रिहर्सल ठेवल्या होत्या. सद्गुरू बापूंनी प्रत्येकाला ठरवून दिलेली गाणी सगळ्यांनी एकत्र येऊन उपलब्ध वाद्यवृंदाच्या साथीने रिहर्सलच्या वेळी आम्ही म्हणायचो. वाद्यवृंदात तबला, ढोलकी, पेटी आणि सिंथेसायझर अशी लिमिटेड वाद्ये होती. एके दिवशी ऑफिस संपवून अशाच एका रिहर्सलला मी गेलो होतो. गाणी बरीच असल्याने प्रॅक्टिस तीनेक तास तर सहज व्हायची. मी ठाण्याला राहणारा असल्याने वर्षाताईंना सांगून साधारण साडेदहाला प्रॅक्टिस करून निघायचो. पण एके दिवशी प्रॅक्टिस खूप लांबली. साडेदहा वाजले, तरी अजून ७-८ गाणी बाकी होती. मी साडेदहाला निघण्यासाठी नाईलाजाने वर्षाताईंची परवानगी घेतली. माझ्याकडे गाडी असल्यामुळे निघताना अजून कुणाला ठाण्याच्या साईडला यायचंय का, म्हणून मी विचारले. आमच्यात सिंथेसाइझर वाजविणारा आणि ठाण्याला राहणारा चंद्रकांत नावाचा मुलगा होता. त्याच्यासाठी मी १० मिनिटे थांबलो आणि मग आम्ही दोघे दादरहून ठाण्याला जायला एकत्र निघालो.
आपल्या परिवारात श्रद्धावान एकत्र आले कि बापूंविषयी आणि संस्थेविषयी छान गप्पा होतात, तशा आमच्या दोघांच्या गप्पा गाडीत सुरु झाल्या. मी आणि पत्नी बापूंच्या प्रवचनाला १९९७ पासून येत असलो, तरी चंद्रकांत इथे यायला लागून नुकतेच दोनेक महिनेच झाले होते. त्यामुळे साहजिकच तो कुतूहलापोटी मला संस्थेविषयी वेगवेगळी माहिती आणि प्रश्न विचारत होता. मला जमेल तशी मी माहिती सांगत होतो. घाटकोपर यायच्या आधी त्याने पृच्छा केली "काका, सदगुरूचा आपल्या आयुष्यात नक्की रोल काय असतो हो ??". ह्या कमालीची 'खोली' असलेल्या प्रश्नाने मी अंमळ थोडा बावचळलोच. मला तरी असे काय मोठेसे माहिती होते, कि मी त्याचे नीट शंका निरसन करू शकेन ?? ते देखील एकीकडे ड्राइविंग करताना आणि रात्री ११ वाजता मी कसे करणार होतो ?? तरी देखील कर्तव्यादाखल मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मनोमन ठरवले. एकीकडे मी तिन्ही आरशांमध्ये बघून अतिशय सावधपणे गाडी चालवत होतो. समोरच्या आरश्यात मला दिसले कि एक टाटा सुमो आमच्या बरोब्बर मागून येत होती. ती बघून मी चंद्रकांतला सांगू लागलो ...." हे बघ चंद्रकांत, आता आपल्या मागे एक टाटा सुमो आहे . मी किती व्यवस्थित सगळ्यात उजव्या लेनमधून ६०च्या स्पीडने चाललोय हे तू बघतोच आहेस. तेव्हा माझे माझ्या गाडीवर नक्कीच पूर्ण नियंत्रण आहे. बरोबर आहे ??" बिचारा चंद्रकांत म्हणाला -"होय ! ". पण असे असले, तरी मागचा सुमोवाला मला येऊन धडकणार नाही ह्याची मला काय गॅरंटी आहे ?? चंद्रकांत -"हो, खरंय काका !" पुढे मी त्याला म्हटलं -"हां, मग इथेच सद्गुरूंचा रोल सुरु होतो. आपण जर श्रद्धावान असू , तर तुमची सगळी काळजी सदगुरु घेणारच. अगदी तशी वेळ आली, तरी परिस्थितीचं योग्य नियंत्रण करून तुम्हाला सद्गुरूं काही अपाय किंवा इजा होऊन देणार नाहीत".
हा आमचा संवाद घाटकोपरच्या फ्लाय ओव्हरवर चढताना चालला होता. आणि पाहतो तो काय ........ माझं बोलून होतंय न होतंय तोच क्षणार्धात मागील सुमोवाला मोट्ठे हेड लाईट्स करून माझ्या डावीकडून येऊन मला काही सेकंदात आमच्या गाडीला जवळजवळ घासून ओव्हरटेक करून पुढे गेला पण. त्याने हे करताना माझ्या डाव्या बाजूचा इंडिकेटर लॅम्प उडवला होता हे आवाजावरून माझ्या लक्षात आलं होतं. आम्ही बोलतोय काय आणि क्षणार्धात आम्हाला प्रचिती येते काय, अशी ही घटना आहे. मी काही पुढे सुमोवाल्याला chase केलं नाही, कारण तो भलत्याच स्पीडने पुढे निघून गेला. पण हे सगळं बघून चंद्रकांत चक्रावून गेला ( आणि मी देखील...!! ). त्याच्या प्रश्नाचे उत्तर सुचेल तसे मी दिले खरें, पण त्या उत्तराला जणू काही नोटराइझ किंवा endorse करण्याचे काम माझ्या सद्गुरूने केलं होतं.
नीट विचार करा आता ह्या घटनेचा. आपल्याकडे भारतात ड्राइवर नेहमी गाडीच्या उजवीकडे बसतो. म्हणजे डावीकडून overtake करताना त्याचा अंदाज माझ्याही पेक्षा जास्त पाहिजे, कारण माझ्या गाडीची डावी बाजू त्याच्यापासून काही इंचावर असणार. जर मागच्या ड्रायव्हरला मला ओव्हरटेक करायचे होते, तर तो माझ्या गाडीपासून फूटभर तरी सुरक्षित अंतर ठेऊ करू शकला असता. पण त्याने अजिबात अंतर न ठेवता घासून ओव्हरटेक केले. ह्याचा अर्थ तो माझ्या ६० च्या स्पीडमुळे एकतर प्रचंड रागावला तरी असेल किंवा तो नशेमध्ये तरी असावा. दुसरीच शक्यता जास्त आहे. आता दारूच्या नशेत असलेला ड्राइवर आमच्या गाडीला ठोकू शकला नसता का ?? पण तसं झालं नाही....... बापू, मी अंबज्ञ आहे !!🙏
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
हा तर नुसता ट्रेलर होता .....
माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी किमान ५ वेळा भयंकर अपघातातून नुसता सहीसलामत नव्हे, तर अंगावर ओरखडाही न उठता वाचलोय. मी १९९७ साली बापूंच्या चरणी आल्यानंतर ३ वेळा मी कसा 'बाल बाल' वाचलो, हे मी खाली मुद्दाम लिहीत आहे. हे तिन्ही अनुभव काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. ते वाचल्यावर चंद्रकांतला मी वरती सहज सांगितलेल्या गोष्टीची आणि सद्गुरूतत्वाची सत्यता कोणालाही पटावी. प्रत्येक वेळी मला बापूंनी काळाच्या दाढेतून अलगद बाहेर काढलंय. कसं ते जरूर वाचा .....

अनुभव -१)
ही घटना आहे २००० सालची !! मी तेव्हा Lincoln Electric ह्या कंपनीत कामाला होतो. माझे ऑफिस पवईला होते. एका सोमवारी आमचे एशिया पॅसिफिकचे प्रेसिडेन्ट आमच्या ऑफिसला येणार होते. आमचे आमचा MD त्यांना पीकअप करायला आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ८ वाजता गेले होते. त्यामुळे ऑफिसची बाकी सगळी जबाबदारी माझ्यावर होती. मी ठीक ७.३० वाजता ठाण्याहून माझ्या कारने निघालो. सकाळची वेळ असल्याने भरपूर गाड्या ट्रॅफिकमध्ये होत्या. मुलुंड टोलनाका संपल्यावर जो फ्लायओव्हर आहे, त्याच्या उतारावर माझी गाडी होती. एव्हढ्यात पुढून कुठल्यातरी गाडीचा करकचून ब्रेक लावल्याचा आवाज झाला. १० सेकंदांच्या आत माझ्या मागच्या आणि पुढच्या अशा मिळून सात गाड्या एकमेकांवर आदळल्या. झालं होतं असं, कि हायवेवर कोणीतरी अचानक रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवायला सगळ्यात पुढच्या गाडीने अर्जंट ब्रेक मारला. आणि अर्थात मागल्या गाड्यांनी 'ब्रेकिंग डिस्टन्स' न ठेवल्याने प्रत्येकालाच अचानक ब्रेक मारावे लागले. परिणामी ७ गाड्या एकमेकांवर आदळल्या. निदान आमच्या गाड्या उतारावरून पूर्ण खाली आल्या होत्या म्हणून अति वाईट अपघात टळला. माझ्या पुढे आणि मागे दणदणीत गाड्या असल्याने माझ्या मारुती ८०० च्या बॉनेटचे बऱ्यापैकी नुकसान झाले आणि थोडेफार डिकीचेही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल कि नुसतं खरचटणं तर राहोच, पण ह्या सगळ्या धुमश्चक्रीत माझा चष्मा देखील उडाला नाही. माझ्या दुर्दैवाने नेमका माझ्या गाडीचा विमा २ दिवस आधीच संपला असल्याने मला संपूर्ण गाडी पूर्ववत करून घेण्यासाठी त्यावेळी रुपये १५,०००/- (म्हणजे आत्ताचे निदान लाखभर रुपये ) खर्च करावे लागले. खर्चाचा आकडा एव्हढ्याचसाठी लिहिला कि त्यामुळे नासधूस केव्हढी झाली असणार आणि अपघात किती मोठ्ठा होता हे कळेल. प्रत्येकालाच आपला जीव प्यारा असतो आणि आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा तो 'अमूल्य' असतो. बापूंनी माझा जीव वाचवून माझ्या प्रारब्धाचे भोग पंधरा हजार रुपयात वळते केले. त्रिविक्रमाच्या १० व्या वचनातील "सौम्य करीन दैव ...." म्हणजे नक्की काय आणि सदगुरुमार्फत त्रिविक्रम दिलेले वचन कसे पूर्ण करतो, हे यातून श्रद्धावानांना नक्की कळेल !!
अनुभव -२)
हा अनुभव २००५ सालचा आहे. मी नुकताच नोकरीसाठी दुबईत गेलो होतो. ऑक्टोबरमध्ये ड्रायविंग लायसन्सही मिळालं. दुबई पोलीस लायसन्स देताना खूप स्ट्रिक्ट असतात हे खरं असलं, तरी लायसन्स मिळालं म्हणजे आपल्याला उत्तम गाडी चालवता येते अशी स्वतःची समजूत करून घेणं चुकीचं आहे. तिथले सहा सहा पदरी अवाढव्य रस्ते, चक्रावून टाकणाऱ्या फ्लायओव्हर्सची मोठ्ठाली वेटोळी, राऊंड अबाऊटची संकल्पना, सायनेज बोर्ड्स, इंटरचेंजेस, स्पीड रडार्स, exits , loops , diversions , थांबण्याच्या जागा, खाणाखुणा, ट्रॅफिकची शिस्त अशा एक ना अनेक नवीन गोष्टी शिकायच्या अजून बाकी होत्याच. अशा वेळी खरं म्हणजे आपल्याबरोबर गाडीत कुणीतरी असणं हे बरं असतं. पण लोक नवीन ड्राईव्हर बरोबर बसायला अर्थातच घाबरतात. दुबई-अबूधाबीत राऊंड अबाऊटची संकल्पना आहे. आपल्याकडे चार दिशांनी येणारे रस्ते जिथे जंक्शनला मिळतात त्याला चौक म्हणतात. ट्रॅफिक सिग्नल नसेल, तर सगळी वाहने हे जंक्शन क्रॉस करताना एकमेकांवर कुरघोडी करतात. नेमके हेच टाळण्यासाठी दुबईत जिथे चौक असायला हवा, तिथे एक राऊंडअबाऊट असतो, ज्याच्या भोवती ट्रॅफिकचे नियमन केले जाते. हे राऊंडअबाऊटस १० फूट व्यासापासून ३०० मीटर व्यासपर्यंत असतात. सहसा चारी किंवा जास्त बाजूने सहा पदरी रस्ते जर एका चौकात भेटत असतील, तर तिथे असलेला राऊंड अबाऊट हा महाकाय असतो. (वाचकांना समजण्यासाठी मी मुद्दाम फोटो दिला आहे ).
तर एकदा काय झालं..... मला माझ्या एका कस्टमरकडे गाडी घेऊन लांब जायचे होते (मला वाटतं Jabel Ali-Lehbab road) आणि मध्ये एक असाच स्टेडियमच्या साईझचा राउंड अबाऊट लागणार होता (जो मी त्यापूर्वी कधीही पाहिला नव्हता). सुदैवाने माझ्या शेजारी गाडीत माझ्याबरोबर काम करणारा एक इंजिनीअर होता आणि तो मला नॅव्हिगेट करत होता. आम्ही हळूहळू (म्हणजे १०० च्या स्पीडने😛) ह्या राउंड अबाऊटकडे कूच करत होतो. हा खरा गोलाकार असला, तरी अतिविशाल असल्याने मला समोरून क्षितिजासारखा आडवा आणि सरळच दिसत होता. त्यामुळे मला वाटले कि समोर डेड एन्ड आलाय. माझ्या बाजूला बसलेल्या इंजिनिअरने मला दोन तीन वेळा " Go straight " असे सांगून बघितले. पण मला काही कळलं नाही. मी त्याला सांगतोय "अरे समोर डेड एन्ड दिसतोय आणि तू सरळ जा म्हणून काय सांगतोयस ? " तो म्हणाला " Sir, it is not dead-end. It is a BIG roundabout. वास्तविक एक विशिष्ट सिग्नल देऊन मी तो ओलांडून जायचे होते. हे सगळं कमालीचं गोंधळात टाकणारे होते. माझी स्थिती चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यूसारखी झाली होती. खूप रहदारीच्या ह्या राउंड अबाऊटकडे तोंड करून त्याच्या भोवती असलेल्या सहा पदरी रस्त्याला क्रॉस करून मी 'आ' वासून बघत उभा राहिलो. हे खूप hazardous किंवा धोकादायक होते. एव्हढ्यात डावीकडून काही वाहने मोठमोठ्यांदा हॉर्न वाजवून १२० च्या स्पीडने माझ्या समोरून आणि मागून काटकोनात निघून गेली, तेव्हा माझा नुसता थरकाप उडाला. (कल्पना करा कि उद्या मी जर आपल्या हायवेवर आडवी गाडी घालून उभा राहिलो, तर मला कुठलेही वाहन उडवणार नाही का सहज ??) नेमकी तीच Situation स्थिती होती. पाच सहा वाहने माझ्या मागून पुढून बोंब मारून निघून गेल्यावर माझ्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला आणि सगळी व्यूहरचना माझ्या लक्षात आली. मी गाडी Rightला घेऊन हळूहळू राऊंड अबाऊट भोवती अर्धी प्रदक्षिणा घालून पुढे निघून जायला हवे होते. अखेर मी राउंड अबाऊटला समांतर गाडी चालवून तो सुरक्षितपणे पुढे ओलांडून गेलो. मी एका भयावह होऊ शकणाऱ्या अपघातातून बचावलो होतो. मला जर वेळेवर काय करायचे समजले नसते, तर १०१ टक्के एखाद दुसऱ्या गाडीने मला उडवलेच असते. माझ्या चुकीमुळे बरोबर बसलेल्या माझ्या मित्राचाही जीव मी धोक्यात घातला. ( म्हणजे आणखी एक पाप माझ्या नांवे लागलं असतं !!). मी माझ्या अज्ञानामुळे म्हणा किंवा गैरसमजुतीमुळे म्हणा, अक्षरशः मृत्यूच्या दाढेत उभा होतो. पण त्या २-३ मिनिटात सद्गुरूने माझ्या गाडीला दुसऱ्या गाडीचा स्पर्शही होऊ दिला नाही. खूप जुनी म्हण आहे आपल्याकडे ............. 'देव तारी, त्याला कोण मारी ...??'🙏
अनुभव -३)
हा अनुभव २०१२ चा आहे. दुबईमध्ये काम करताना मला महिन्यातून एकदा कामासाठी अबूधाबीला जावे लागे. दुबई-अबुधाबी हे अंतर जाऊन येऊन ३२० किलोमीटर आहे. पण माझी गाडी चांगली असल्याने बहुधा प्रवासाचा ताण जाणवत नसे. एके दिवशी सकाळी ७ वाजता मी अबूधाबीला जायला बाहेर पडलो. तिथे पोचल्यावर आधी अबूधाबी ऑफिसचे काम संपवले आणि मग काही कस्टमर्सकडे Visits करायच्या होत्या, तिथे जायला निघालो. बहुधा उन्हाळा असावा. माझे वेल्डिंग क्षेत्रातील काम असल्याने बरेच वेळा कारखान्यात किंवा एखाद्या साईटवर तळपत्या उन्हातून जावे लागे. प्रचंड उकाड्यात मी सगळ्या व्हिजिट्स संपवून संध्याकाळी साडेपाच वाजता अबूधाबीहुन दुबईकडे निघालो. मी नुकतेच वयाचे ५१ वे वर्ष पार केलेलं होतं. दिवस खूप मेहनतीचा असला, कि संध्याकाळी मध्ये चहासाठी सुद्धा कुठेही न थांबता सरळ घरीच जावे असे साहजिकच वाटे. तद्वतच मी कुठेही न थांबता नॉनस्टॉप दुबईकडे निघालो. जबेलअली हा महत्वाचा टप्पा पार केला; म्हणजे ११० किमी ओलांडले असावे . डोळ्यात आणि शरीरात आज थकवा जाणवत होता. पण तरी नेटाने माझे ड्रायविंग सुरूच
ठेवले. अमिरेत मॉल ओलांडल्यावर एक 'मेट्रोपॉलिटन' नावाचे हॉटेल शेख झायेद रोडवर लागते, तेही ओलांडले. आणि काय सांगू .....माझा डोळा एका निसटत्या क्षणाला लागला... तोही चालत्या गाडीत स्टेअरिंगवर असताना !! साधारण अर्धे मिनिट माझी गाडी सुरूच होती आणि मी चक्क झोपलो होतो. मेट्रोपॉलिटनपासून 'ट्रेड सेंटर राउंड अबाऊट' साधारण दीड किलोमीटर असावा. तो यायच्या जस्ट आधी मला आपसूक जाग आली आणि मी एकदम चपापलोच. अरेच्या, आपण झोपलो होतो गाडी चालवताना ... ?? काय हे अघटित आणि बेजबाबदार वर्तन ????😲 पुढे ३०० मीटरवर ट्रेंड सेंटर सिग्नल होता. मी ह्या धक्क्यातून स्वतःला सावरीत कशीबशी गाडी सिग्नलला येऊन उभी केली. मला अजून ५ मिनिटांनी जरी जाग आली असती, तरी काहीही उपयोग झाला नसता, कारण माझी गाडी सिग्नलला थांबलेल्या पुढल्या वाहनांना उडवून पुढे गेली असती आणि काय झालं असतं याची कल्पना 'न' केलेलीच बरी ..... !! काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असा हा प्रसंग आहे. मला वेळीच झोपेतून उठवणारा कोण होता, हे श्रद्धावानांना खरंच वेगळे सांगण्याची गरज आहे का ...??
Indicator Lamp चा अनुभव सद्गुरुचं भक्तावर किती लक्ष असतं ते स्पष्टपणे सांगतो आणि मला आलेले पुढले ३ वेगवेगळे अनुभव ह्या तत्वाला पुष्टीच देतात. तिन्ही अनुभव वाचल्यावर आपल्याला हे नक्की कळेल कि आपलं जीवन किती क्षणभंगुर आहे. अपघाताची वेळ आपल्यावर येते ती आपापल्या 'प्रारब्धामुळे'. पण सद्गुरू त्याच्या अकारण कारुण्याने आपल्या प्रारब्धाची धग आपल्याला लागूच देत नाही. 'ओवाळू गे माये अनिरुद्ध' ह्या आरतीतील पहिला चरण आठवा ....
चक्रधराचे चक्र फिरतसे , सदैव लीलेने I
प्रारब्धाचा चेंदामेंदा सहज करू जाणे II
सद्गुरू आपल्याला अनेक अडचणीतून 'त्याच्या' मार्गाने बाहेर काढतो. 'भवसागर तरून नेणं' म्हणजे आणखी काय वेगळं आहे ..??
II ॐ मन:सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः II 🙏🌸

विकाससिंह कात्रे, ठाणे.
मो. नं. : ९८३३६१०८७५
मो. नं. : ९८३३६१०८७५

Comments
Post a Comment