भेळपुरीवाला 'विठ्ठल'...!!
हा अनुभव १९९९ सालचा आहे..... !! तुम्ही फोर्टातल्या न्यू एक्सलसिअर सिनेमा थिएटरजवळच्या 'विठ्ठल' मध्ये कधी भेळपुरी खाललेय का ?? मुंबईतली मला सगळ्यात आवडणारी भेळ तो द्यायचा. आता देतो कि नाही माहिती नाही. पण त्याच्यापेक्षा 'मंतरलेली भेळ' देणाऱ्या माझ्या विठ्ठलाने मला दिलेला हा अनुभव आहे ......
त्या काळात गुरुवारची उपासना आणि बापूंचे प्रवचन दादरच्या अँटोनियो डिसिल्वा हायस्कुलला व्हायचे. एका गुरुवारी मला बापू परिवारात आणणारा माझा अनेक वर्षांचा मित्र चारुहाससिंह (शृंगारपुरे) आणि मी अशा दोघांनी ऑफिस संपल्यावर चारुच्याच कारने दादरकडे कूच केले. मला त्याने संध्याकाळी ठीक ५. ३० वाजता कांजूरहून पीक-अप केले. दिवसभर खूप कामात गेल्यामुळे माटुंगा येईपर्यंत आम्हां दोघांनाही सडकून भूक लागली. एकदा विचार आला कि कुठेतरी हॉटेलजवळ गाडी थांबवून खाऊन घ्यावे. पण तसं केलं असतं, तर उपासना केंद्रावर पोचायला उशीर झाला असता. दादरच्या टिळक ब्रिजवर आल्यावर चारुने एक वेगळीच शक्कल सुचविली. तो म्हणाला " डिसिल्वा हायस्कुलच्या समोर एक भेळपुरीची गाडी असते, तिथे थोडं हादडुयात का आपण ??". पण मला ते गैर वाटलं. असंच कुठेतरी गाडीवर भेळ खाणं म्हणजे आपल्या आरोग्याची 'ऐशी का तैशी' होणार. म्हणून मी "नको" म्हटलं. पण दुसरा मार्ग नव्हता हेही खरं. शेवटी मनाचा हिय्या करून आम्ही त्या भेलपुरीच्या गाडीसमोर कार पार्क करून भेळपुरी चापली आणि ७ वाजायच्या आत डिसील्वाच्या मैदानात पोचलो. का कुणास ठाऊक, पण भेळपुरीच्या गाडीवर कृपासिंधू साईबाबांचं लावलेलं चित्र माझ्या नजरेने टिपलं होतं. सुरुवातीच्या उपासनेनंतर बापूंचे मराठी प्रवचन झाले आणि दर्शनाची मोठी रांग सुरु झाली. शाळेच्या गेटमधून आत गेल्यावर मैदान सुरु व्हायच्या आधी एक हॉल लागतो, त्याच्या भोवती बसायला थोडी जागा होती. त्याच्या कट्ट्यावर आम्ही जरा टेकलो. गर्दी किमान दहा- पंधरा हजाराची तरी नक्की असेल. आम्ही जिथे बसलो होतो, तिथे तसा अंधारच होता. ओळखीच्या व्हॉलंटीयर्सना 'हरी ओम' वगैरे करणे, प्रसंगी थोडीशी बातचित करणं वगैरे आमचं दोघांचं चालू होतं. एव्हढ्यात समोरून संस्थेला वाहून घेतलेला श्रद्धावान व्हॉलंटीअर देवेंद्रसिंह देवळेकर आमच्याकडे येताना दिसला. ५ मिनिटे छान गप्पा झाल्या. विषय अर्थातच "बापू " !!. मी त्याला विचारलं "काय चाललंय सध्या ??". त्यावर त्याने जे काही आम्हाला सांगितलं ते अवाक करणारं होतं . देवेंद्र म्हणाला "परवा बापूंनी अध्यात्म प्रबोधिनीच्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगितलं कि सदगुरु आपल्या भक्ताची कुठल्या कुठल्या लेव्हलवर कशी काळजी घेतो ते . बापू म्हणाले कि समजा एखाद्या भक्ताला गाडीवरची भेळपुरी खायची असेल, तर जे काही चुरमुरे, दाणे आणि शेव तो खाणार आहे, त्यातले सगळे जंतू आणि बॅक्टेरिया तो आधीच मारून टाकतो". हे ऐकल्याबरोबर चारू आणि मी अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागलो. देवेंद्रला काहीच कळेना कि हे दोघं असं काय करतायत. मग त्याला आम्ही फक्त एक तासापूर्वी आमच्यात घडलेला किस्सा आणि संवाद सांगितला आणि तोही चक्रावून गेला. हा आहे ह्या अनुभवाचा भाग क्रमांक -१.... !!
त्यानंतर काही आठवड्यातच ह्याच अनुभवाचा भाग क्रमांक-२ खेरवाडीच्या न्यू इंग्लिश स्कुल ( हल्लीचे हरिगुरुग्राम) येथे घडला तो असा.....
प्रवचन झाल्यावर आम्ही माझ्या गाडीने ठाण्याकडे निघालो. आज बरोबर चारू नव्हता. बरोबर होती माझी पत्नी सौ सुचित्रा, सुप्रसिद्ध कवी श्री चंद्रशेखर गोखले ( उर्फ चंगो ) आणि त्याची पत्नी सौ उमा गोखले. शेखरला सवय होती कि उपासना संपल्यावर खेरवाडीत त्याच रस्त्यावर असलेल्या एका देवळात जाऊन मारुतीचे दर्शन घायचे. मी अर्थातच देवळासमोर गाडी थांबविली. शेखर हनुमंताचे दर्शन घेऊन आला आणि गाडीत बसला. आम्ही आधी सुरु केलेल्या बापूंविषयीच्या गप्पा पुन्हा सुरु झाल्या. मी गाडी सुरु करायच्या आधी नुकताच घडलेला भेळपुरीचा किस्सा त्या दोघांना रंगून ( रंगवून नाही...) चंगोला सांगत होतो. तो किस्सा सांगून संपला आणि त्या क्षणी समोरच्या अंधारातून कोणीतरी आमच्या डोळ्यासमोर बॅटरीचा प्रकाश पाजळला. प्रकाशामुळे व्यक्ती दिसली नाही. पण ती व्यक्ती बॉनेटजवळ आल्यावर लक्षात आलं कोण आहे ते. तो दुसरा तिसरा कुणी नसून ' देवेंद्र देवळेकर' होता !! हा मनुष्य इथे काय करतोय ?? कारण शाळेपासून देऊळ किमान अर्ध्या किलोमीटरवर आहे. तो शाळेत भेटला असता तर मी समजू शकतो. पण इथे अर्धा किलोमीटर लांब मारुतीच्या मंदिराजवळ आणि तेही मी अनुभव कथन करत असताना नेमका तिथे कसा आला याचे उत्तर मला आजतगायत मिळालेले नाही. (त्रिविक्रमाच्या १८ वचनांमध्ये एका वचनात म्हटले आहे कि '....मात्र माझे मार्ग त्रिनाथासीच ज्ञात', ते उगीच नाही). पण मी फारशी पृच्छा न करता देवेंद्रला सांगितलं कि अरे मी आपला किस्सा शेखरला सांगत होतो. तो फक्त हसला.....!!
मला या अनुभवासंदर्भात पडलेले प्रश्न वाचकांच्या चिंतनासाठी येथे देत आहे....
१) अध्यात्मिक प्रबोधिनीची मिटिंग तर आम्ही भेळपुरी खाण्याच्या आधी २ दिवस झाली होती. म्हणजे आपले दोन भक्त दुसऱ्या दिवशी काय आणि कुठे खाणार आहेत हे बापूंना दोन दिवस आधी कळलं का ?? २) चारुहाससिंहला नेमकी भेळच खावीशी का वाटली ?? ३) ह्या जगातल्या नंबर एकच्या नेपथ्यकाराने डिसिल्वा शाळेच्या बाहेर भेलपुरीची गाडी सेटवर नेमकी कशी बरं लावली होती ?? ४) दहा-पंधरा हजार श्रद्धावानांच्या गर्दीत केवळ आम्हाला अनुभव देण्यासाठी बापूंनी मॅच फिक्स करून देवेंद्रला नेमके आमच्या पर्यंत धाडले. बरे आमच्या तोंडी प्रश्नही घातला कि " काय चाललंय सध्या ??". ह्यातली कुठलीही एक गोष्ट घडली नसती, तर आम्हाला हा चक्रावून टाकणारा अनुभव आला असता का ..?? नाटकाच्या पहिल्या अंकात आम्हां तिघांनाही अनुभव मिळाला. मग नाटकाच्या दुसऱ्या अंकात मला conduit करून शेखर-उमाला त्याच कथानकाचा पुढचा अनुभव दिला. (नटनाटकी दावी वाकुल्या भिववी छाया रंग ..... हे भजन आठवा). पुन्हा इथे देवेंद्रला आमच्याकडे पाठवले. म्हणजे सद्गुरुला तुम्हाला काही शिकवायचं असेल तर तो आपल्यातल्याच एखाद्या श्रद्धावानाला देवदूत करू शकतो. तुम्ही नेहमीच सावध राहून शिकलं पाहिजे, वागलं पाहिजे. ५) श्रद्धावानाला अनुभव देणं हा काय सद्गुरूंचा टाइम पास आहे का ?? नक्कीच नाही. सगळ्या विश्वाचा पसारा ज्याला सांभाळायचा आहे, असंख्य पीडितांना ज्याला सावरायचे असते, ज्याचे तिसरे पाऊल एव्हढ्या सगळ्या श्रद्धावानांच्या संकटास तुडविण्यात गुंतले आहे, त्याच्याकडे टाइमपासला वेळ असेल का ?? तर नक्कीच नाही. भक्ताची श्रद्धा अधिकाधिक द्दढ करण्यासाठी सद्गुरू अनुभव देतो आणि एका परीने आपल्याला भेटतो सुद्धा. ६) विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एव्हढ्या सूक्ष्म गोष्टी ज्या सद्गुरुला कळतात आणि जो एखादा प्रसंग अनुभव देण्यासाठी तुमच्या आयुष्यात घडवून आणू शकतो , तो तुमच्यासाठी काय करू शकणार नाही ??
समीरदादा म्हणतात तसे मी स्वतः काय आहे, माझी भक्ती कुठल्या स्तरावर आहे हे मला स्वतःला नक्की माहिते. तरीही बापूंनी मला हा अनुभव दिला. हे अकारण कारुण्यच नाही का ?? आपणा सर्वांनाही असेच 'अकारण कारुण्य' लाभावे हीच गुरुपौर्णिमेनिमित्त अनिरुद्ध शुभेच्छा !!
विकाससिंह कात्रे, ठाणे.
मो. नं. : ९८३३६१०८७५

II ॐ मन:सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः II 🙏
Shreeram.
ReplyDeleteAmbadnya
अंबज्ञ नाथसंविध्
DeleteAmbadnya
ReplyDeleteअंबज्ञ नाथसंविध्
Deleteअंबज्ञ नाथसंविध्
ReplyDeleteअंबज्ञ नाथसंविध्
Deleteअगाध शक्ती अघटित लीला तव सदगुरु राया
ReplyDeleteअंबज्ञ नाथसंविध्
DeleteAgadhlila 🙏🙏🙏
ReplyDeleteअंबज्ञ नाथसंविध्
Deleteखुप छान लिखान स्वत:चाच अनुभव वाचल्या सारखा वाटतो अ्बज्ञ
ReplyDeleteअंबज्ञ नाथसंविध्
DeleteMast
ReplyDelete